Skip to content Skip to footer

मेनोपॉज विशेषज्ञ किंवा संबंधित चिकित्सकांचा सल्ला

या समस्या जाणवतात का?

३५ वर्षानंतर येणाऱ्या समस्या ज्या तुम्ही स्वतः अनुभवता त्यांना अधोरेखित करा आणि तुमच्या आरोग्याची तपासणी करा. खाली दिलेल्या समस्यांपैकी जर तुम्ही एक किंवा दोन समस्यांनी पिडीत असाल तर निश्चितच तुम्ही मेनोपॉज विशेषज्ञ किंवा संबंधित चिकित्सकांचा सल्ला घ्या.

या समस्या जाणवतात?

  • मासिक चक्र बंद आहे / अनियमितता /नियमित आहे का?
  • मासिक चक्राच्या पूर्वी जडपणा येतो का? स्तन /पोट / डोके / पाय दुखतात का?
  • शरीरातून गरम वाफा येणे / रात्री खूप घाम येणे?
  • हातपाय थंड पडणे / थकवा / काम करण्याची शक्ती कमी होणे ?
  • भीती वाटणे / चक्कर येणे / अचानक हृदयाचे ठोके वाढणे ?
  • दम लागणे / अशक्तपणा / मानसिक नैराश्य /उदासिनता येते का?
  • स्मरणशक्ती कमी होणे / मन न लागणे / एकटे वाटणे?
  • डोके दुखणे / झोप कमी येणे ?
  • भूक कमी लागणे ? भूक सहन न होणे / वजन वाढते आहे का?
  • लघवीच्या जागी कोरडेपणा व खाज होणे / लघवी सारखी येणे / लघवीमध्ये नियमंत्रण नसणे (लघवी गळणे)?
  • स्तनांमध्ये जडपणा / स्तन दुखणे / सूज येणे ?
  • त्वचा लवकर निळी पडणे / थकवा येणे?
  • कंबर, पाठ व टाचांमध्ये दुखणे / कुबड निघणे ?
  • सांधे व मांसपेशीमध्ये दुखणे ?
  • हलक्या मारानेही फॅक्चर होणे?

३० वर्षांवरील स्त्रियांना खालील तपासणी करावी लागू शकते:

  • रक्त, लघवी तपासणी
  • हाडांतील ठिसुळपणा, चरबी तपासणी (Obesity)
  • रक्तातील कॅल्शियम, थायरॉईड, साखर तपासणी
  • फुफ्फुसाची शक्ती (IMPULSE OSCILLOMETRY)
  • गरजू स्त्रियांना सोनोग्राफी
  • गर्भपिशवी व गर्भाशयट मुखाची तपासणी
  • गरजू स्त्रियांना स्तन तपासणी (Mamography)
  • पॅप स्मिअर (पांढऱ्या पाण्याची तपासणी)

Leave a comment